बीड जिल्ह्यात जीवनावश्यक शेतमाल थेट ग्राहकांना घरपोच!
शेतकरी ते ग्राहक ;स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपक्रम 

बीड जिल्ह्यात जीवनावश्यक शेतमाल थेट ग्राहकांना घरपोच!

बीड/प्रतिनिधी 

लॉक डाऊन काळात बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य व शेतमाल खरेदी बंद असून खरीप हंगाम 2020 जवळ येत आहे शेतकऱ्यांना नांगरणी, मोगडणी, पाळी आदी शेत मशागतीची कामे करण्यासाठी आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.आशा परिस्थितीत त्यांच्याकडील उपलब्ध धान्य ,शेतमाल विक्री होणे अत्यंत आवश्यक असल्याने शेतकरी ते ग्राहक हा उपक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राबवला आहे.

प्रशासनाने सोशल डिस्टन राखण्यासाठी  संचारबंदी अधीक कडक केली असून ग्राहकांना कृषि विभागाच्या नियंत्रणात व परवानगीने भाजीपाला ,फळे शेतकरी उत्पादक संस्थेकडून दारावर उपलब्ध केली आहेत.त्याच धर्तीवर इतर जीवनावश्यक शेतमाल धान्य डाळी नागरी भागातील ग्राहकांना रास्त दरात मिळावे  म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा.राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात दिनांक 17एप्रिल पासून बीड ,गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज,वडवणी शहरात कृषी निविष्ठा संस्थांमार्फत  शेतकरी ते ग्राहक हा उपक्रम जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी राबवला आहे 

संपूर्ण लॉकडाऊन काळात गहू,ज्वारी,आदी धान्याचे विक्री दारोदारी जाऊन केली जात असून संचारबंदी कायद्याचे सर्व नियम पाळून सदर शेतकरी ते ग्राहक हा व्यवहार पूर्ण केला जात असून बीड शहरात व इतर शहरी भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बीड -कामधेनू शेतकरी स्वयंसहायता बचत गट माजलगाव --ऍड.रामराव नाटकर कृषी निविष्ठा अंबाजोगाई -राजमाता जिजाऊ महिला सेवा सहकारी संस्था ,केज -नवनिर्माण बहुउदेशीय सेवाभावी संस्था ,वडवणी -कामधेनू शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट या संस्था शेतमाल ग्राहकांना पोहच करत आहेत.

या कामी कुलदीप करपे,बी.एस.पठाण ,पोपट कथले,वशिष्ठ नवले,बीड अमित नाटकर, माजलगाव,ऍड.दिलीप करपे ,अंबाजोगाई

गोविंद आगे ,वडवणी उध्दव साबळे ,गेवराई,आनंद ढाकणे केज आदी परिश्रम घेत आहेत.