लॉकडाऊन वाढले;ऊसतोड कामगार अधांतरी १४ एप्रिलपर्यंत मार्ग निघणे होते अपेक्षित; आणखी अठरा दिवस घराबाहेर

१४ एप्रिलपर्यंत मार्ग निघणे होते अपेक्षित; आणखी अठरा दिवस घराबाहेर थांबणे अशक्य


बीड : प्रतिनिधी लॉकडाऊन झाल्यानंतरही काही साखर कारखाने सुरु होते. यामुळे बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजुर पश्चिम महाराष्ट्रातच अडकून पडले आहेत. मोठ्या संख्येने असलेले हे ऊसतोड मजुर गत सहा महिन्यासून आपल्या घरापासून दूर आहेत. आता १४ एप्रिलपर्यंत यावर मार्ग निघेल अशी अपेक्षित होते. परंतु आता लॉकडाऊन वाढल्याने ऊसतोड मजुरांच्या घरी परतण्यावर लागलेले प्रश्नचिन्ह कायम आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे या दोघांनीही यासाठी प्रयत्न केले आहेत, परंतु अद्याप मार्ग निघालेला नाही. जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजुर पोट भरण्यासाठी सहा महिने ऊसतोड करतात. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची उचल घेऊन हे मजुर रात्रंदिवस घाम गाळत साखर निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलतात. यावर्षी कोरोना संकटामुळे या ऊसतोड मजुरांच्या हालअपेष्टात अधिकच भर पडली आहे. ऐन हंगाम संपण्याच्या काळात कोरोना संसर्ग सुरु झाला. यातच भर म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांना स्वगृही कोल्हापूर, इस्लामपुर भागात काही रुग्ण आढळले. परिणामी या भागातून परतणाऱ्या मजुरांना रोखण्यात आले. काही मजुर कारखाना परिसरातच थांबवण्यात आले तर काही मजुर जिल्ह्याच्या सिमेवर दाखल झाले आहेत. या मजुरांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे. या मजुरांना त्यांच्या घरी किंवा गाव शिवारात जाण्याची परवानगी देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतांना आवाज अद्याप प्रशासनापर्यंत प्रशासनाकडून याला विलंब लावला पोहचलाच नसल्याचे दिसते. आगामी जात आहे. ऊसतोड मजुरांवर अक्षरशः काळात आणखी प्रश्न निर्माण रडण्याची वेळ आली असून काहीही होण्यापूर्वीच ऊसतोड मजुरांना गावी करुन आम्हाला घरी न्या अशी आर्त पोहचवण्याची व्यवस्था करावी, अशी हाक देत असून त्यांचा क्षीण झालेला मागणी होत आहे.